“कीर्तन गुरुकुल” हा एक आध्यात्मिक व सांस्कृतिक उपक्रम आहे, जो संत परंपरेतील अखंड कीर्तन परंपरेला नव्या युगात शुद्ध सांप्रदायिक रीतीने पुढे नेण्याचा संकल्प बाळगून सुरू झाला आहे.
आमचे उद्दिष्ट केवळ शिकविणे नाही — तर भक्तीच्या मार्गाने समाजात संस्कार, मूल्ये आणि शांती रुजविणे आहे.
या गुरुकुलामध्ये विद्यार्थी आणि रसिक भक्तांना ऑनलाईन माध्यमातून कीर्तन परंपरेचे सैद्धांतिक आणि व्यावहारिक प्रशिक्षण दिले जाते. संतांचा उपदेश, अभंग, प्रवचनकला, नामस्मरण, सादरीकरण कौशल्य — या सर्व घटकांचा अभ्यास करून कीर्तन साधनेचा खरा आत्मा अनुभवता येतो.
कीर्तन ही केवळ कला नाही — ते विचारांचे, भक्तीचे, आणि उधराचे माध्यम आहे. म्हणूनच आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये भक्तीभाव, उपासना, आणि अध्यात्मिक दृष्टिकोन जागविण्याचा प्रयत्न करतो.
वारकरी संप्रदायाचे पाईक
कीर्तनकार
संत साहित्य अभ्यासक
B.E. | M.A. Philosophy
24 वर्ष वारकरी कीर्तनसेवेचा अनुभव
विशेष – इंग्रजी कीर्तन सादरीकरण
वारकरी संप्रदायाचे पाईक
कीर्तनकार
प्राध्यापक – भारती विद्यापीठ
संपादक – वारकरी दर्पण
M.A. Philosophy
20 वर्ष वारकरी कीर्तनसेवेचा अनुभव
श्रीमद् भगवद्गीतेचे अन्वयार्थ या विषयावरील PhD संशोधक – पुणे विद्यापीठ
प्रवर्तक – परिवर्तन गुरुकुल
वारकरी संप्रदायाचे पाईक
शास्त्रीय गायक श्री.राहुलजी देशपांडे यांचे शिष्य
संगीत अलंकार
20 वर्ष वारकरी कीर्तनातील गायनसेवेचा अनुभव
कीर्तन गुरुकुल चे प्रमुख ध्येय म्हणजे वारकरी परंपरेतील अध्यात्म, संस्कार, आणि भक्ती यांचा प्रसार करून समाजाला नवी दिशा देणे.
आमच्या शिक्षणातून विद्यार्थी केवळ कीर्तनकारच नव्हे, तर संस्कारित, सजग आणि संवेदनशील समाजसेवक म्हणून घडतात.
खालील उद्दिष्टे आमच्या कार्याची पायाभूत मूल्ये आहेत —
🔸 संतवाङ्मयाचा प्रसार संतवाङ्मयातील जीवनमूल्ये व नीतीमूल्ये समाजापर्यंत पोहोचवणे.
🔸 कीर्तन परंपरेचे जतन व संवर्धन शुद्ध सांप्रदायिक मर्यादेत कीर्तन व प्रवचन यांचे प्रशिक्षण देणे.
🔸 आध्यात्मिक व नैतिक संस्कार भक्ती, दया, नम्रता व परस्परप्रेमाची जडणघडण करणे.
🔸 वारकरी संगीतातील अंग जतन करणे टाळ , चिपळ्या, गायन या परंपरागत संगीतातील अंगांचे प्रशिक्षण व संवर्धन करणे.
🔸 ज्ञान व भक्ती यांचा संगम साधणे अभंगांचा भावार्थ समजावून देत भक्तिरसासोबत जीवनमूल्यांची शिकवण घडवणे.
🔸 तज्ज्ञ मार्गदर्शक संत वाङमयाचा सखोल अभ्यास असणारे निष्ठावंत वारकरी मार्गदर्शक.
🔸 आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ऑनलाइन माध्यमातून वारकरी संत विचारांचा अभ्यास.
🔸 रेकॉर्डेड क्लासेस आणि प्रिंटेड नोट्स काही कारणांमुळे ऑनलाइन वर्गांस उपस्थित राहता न आले तरी रेकॉर्डेड सत्रे पाहता येतील. सोबतच अभ्यासाची गती अखंड राहावी यासाठी मागच्या वर्गाचे सविस्तर नोट्स पोस्ट/कुरीअर द्वारा घरपोच केले जातील.
🔸 प्रेरणादायी अतिथी व्याख्याने मागील वर्गांमध्ये अभ्यासलेले विषय तपासण्यासाठी ऑनलाइन चाचण्या होतील.
🔸 ऑनलाईन चाचण्या अभंगांचा भावार्थ समजावून देत भक्तिरसासोबत जीवनमूल्यांची शिकवण घडवणे.
🔸 प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर एका नामांकित विद्यापीठाकडून प्रमाणपत्र दिले जाईल.
कीर्तन गुरुकुलात सहभागी व्हा आणि भक्ती, संस्कार, व ज्ञानाचा संगम आपल्या जीवनात आणा.